वारी बारी

Started by शिवाजी सांगळे, June 17, 2017, 07:04:07 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

वारी बारी

चालली एकिकडे पंढरीला वारी
येथे भरू लागली गझलेची बारी !

चालले काहि घेवुन हाती पताका
टाळ मृदंग कोणी तुळस डोईवरी !

अखंड ज्ञानयज्ञ भरवितात नित्य
सोहळे येथे शब्दांचे हे शब्दकरी !

भक्त दोन्ही ज्ञानियाचे खरे, प्रिय
एका लेखणी, दुजा वैकुंठ नगरी !

व्हावे प्रबोधन न् भक्ती साफल्य
ध्यास हाच असतो दोघां अंतरी !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९