प्राजक्त

Started by Prajakta37, June 17, 2017, 09:55:09 PM

Previous topic - Next topic

Prajakta37

माझ्या अंगणामध्ये..
पोखरलेला, ओणवा झालेला,
जुनाट, थकलेला अन् रूक्ष
पण सदान्कदा बहरणारा अन्
आसमंत सूगंधित करणारा वृक्ष... 🌳

स्वतः उन्हाच्या झळा सोसूनी
इतरांना वाटावा आनंदच फक्त
असाच आहे हा दुसर्यांच्या
सुखात खळखळ हसणारा प्राजक्त 🌸

कधी कुणी येऊन माझ्या
आयुष्याविषयी मला विचारतो
मी अबोल, निःशब्द, मुकपणे
बोट त्या प्राजक्ता कडे दाखविते ...
:(  :(