खंत

Started by Asu@16, June 18, 2017, 05:41:25 AM

Previous topic - Next topic

Asu@16

     खंत

तुझ्या असण्याने,
जगणे
हसणे होते.
तुझ्या नसण्याने,
जगणे
रडणे होते.
तुझ्या हसण्याचे,
फूल
सदैव फुलते.
माझ्या रडण्याची,
कविता
मात्र होते.
माझ्या समजुतीची,
दाद
तू देते.
खंत इतकीच,
मनास
माझ्या होते.

अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita

मिलिंद कुंभारे


अरूण सु .पाटील

धन्यवाद !