त्याला म्हणतात ....

Started by Asu@16, June 18, 2017, 05:44:52 AM

Previous topic - Next topic

Asu@16

  त्याला म्हणतात ....

मनासारखे जे वागविते
त्याला म्हणतात घर
मनाविरुद्ध जे वागविते
त्याला म्हणतात दार

संबंधात सक्ती असते
त्याला म्हणतात काम
संबंधात भक्ती असते
त्याला म्हणतात प्रेम

आत्मा जिथे असतो
त्याला म्हणतात मन
आत्मा जिथे नसतो
त्याला म्हणतात तन

दुसऱ्याचे मन सुखावणे
त्याला म्हणतात पुण्य
दुसऱ्याचे मन दुखावणे
त्याला म्हणतात पाप

आवडीला दाद देणे
त्याला म्हणतात रसिक
नावडीलाही दाद देणे
त्याला म्हणतात सोशिक

हवे तेव्हा मिळते
त्याला म्हणतात सुख
नको तेव्हा मिळते
त्याला म्हणतात भीक

न मागताही मिळते
त्याला म्हणतात भाग्य
मागताही ना मिळते
त्याला म्हणतात दुर्भाग्य

आपला घास देणे
त्याला म्हणतात संस्कृती
दुसऱ्याचा घास घेणे
त्याला म्हणतात विकृती

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita