कसं होईल ?

Started by Prasad.Patil01, June 19, 2017, 10:44:32 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

कसं होईल ?

सुंदर अशा पहाटेचं स्वप्न गोड तू.
नकळत लागलेली न सुटणारी ओढ तू.
ठाऊक आहे सहवास तुझा क्षणिक राहील माझ्यासाठी,
जणू नियतीने केलेली मुद्दाम  एक खोड तू...

घाबरायला होतं जेव्हा जाग मला येईल.
अशाच एका पहाटे तुझी सोबत नाही राहील.
कसं होईल माझं मला मलाच ठाऊक नाही,
तुझ्याविना माझे मग दिवस कसे जाईल...

नंतर तुला असं मग पाहता येणार नाही .
तुझ्याशी मला मग बोलता येणार नाही,
अशा माझ्या सारख्या सारख्या खोड्या कोण काढेल ?
तुझ्या माझ्यात अंतर आता अचानकच वाढेल ?                  

असं मग लपून लपून कोणाला मी पाहील ?
तुझ्यासारखी काळजी आता कोण माझी घेईल ?
माहित आहे मला तू विसरून मला जाणार,
पण मला तुझी आता आठवण खूप येणार...

                             -   प्रसाद पाटील
                                 (स्वलिखित)