यंदा पांडुरंगा

Started by शिवाजी सांगळे, June 20, 2017, 01:12:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

यंदा पांडुरंगा

देवाजीस प्रिय
भक्त सान थोर
नाही अवडंबर
जातपात !!

भक्तांनी फुलतो
चंद्रभागा तीर
पाहण्या ईश्वर
विटेवरी !!

परस्परामधे
पाहता ईश्वर
सुख हे अपार
जाणवते !!

पाहता एकदा
तृप्त हो नजर
सावळं साजिरं
विठ्ठलाते !!

यंदा पांडुरंगा
कर उपकार
द्यावे भरपूर
पिक पाणी !!

© शिवाजी सांगळे
🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९


कदम

#2
अप्रतिम

शिवाजी सांगळे

Santosh Alanjkarji व के एल कदमजी आठवणीने अभिप्राय दिल्या बद्ल आपले खूप खूप आभार.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९