आयुष्याचं सोन ...

Started by Proakde448@, June 20, 2017, 07:55:55 PM

Previous topic - Next topic

Proakde448@

तुझ्या आठवणींच्या क्षणात
माझं विखरलेलं मन...
या मनाला सावराया
नव्हतं  उरल कोणी पण ...
असा होतो मी घायाळ
जसा मासा पाण्या विन....
माझी व्येथा पुसावया
नाही आलं जगातलं कोण ....
रखरखत्या उन्हातही
नव्हतं कसलाच भान ...
शोधतो ओल्या नयनी
क्षीण जड पावलान ....
तू भेटशील तेव्हा
जेव्हा येशील परतून ...
माती मोल जगण्याचं
होईल आयुष्याचं  सोन ...