मनातलं गुपीत

Started by Rahul Ghorpade, June 20, 2017, 08:59:21 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

आजचा ही दिवस रोजचा सारखाच गेला बाहेर गेलो होतो जरा आज फिरायला
म्हटल याव थोडं फिरून पाऊस झाला आहे खूप
सुंदर झाला असेल निसर्ग म्हणून गेलो होतो बाहेर मी जिथे गेलो होतो ना तिथे एक जोडप बसल होतं..
आणी मी एकटाच होतो
मस्त गाणे ऐकत होतो
जुन्या आठवणींना कुरवाळत
डोळ्यांना ओलावत होतो..
वाहणा-या पाण्यासोबत
जुन्या आठवणींना ह्रदयातुन
काढण्याचा प्रयन्त करत होतो..
तिच्यासोबत घालवलेला
एक एक क्षण मला आता आठवत होता
वाहणा-या अश्रुं सोबत आता तो
क्षण ही वाहत चालला होतो
विसरून जाईल मी तिला
हे मनाशी पक्क ठरवत होतो..
नंतर खुप जोडपं आले तिथे आणी मग त्या सगळ्यां पाहुन ना मला तिची आठवण आली..
तिच्यासोबत घालवलेल्या
क्षणांची पुन्हा डोळ्यांत साठवण झाली..
हेच का ते जाला लोक प्रेम म्हणतात
डोळ्यांत अश्रु होते आणी डोळ्यांतुन ते डबडबत होते
तरीही चेह-यावर हास्य खळखळून उमठून येत होत
कारण डोळ्यासमोर माझ्या
तिचा आता चेहरा आला होता
उदास झालेला माझा चेहरा
तो आता हास्यास्पद करत होता..
तिला दिलेलं मी एक एक वचन आता माझ्या स्मृतीतुन माझ्या डोळ्यासमोर आले होते
असतील तिची काही कारणे मजबुरी
म्हणून ती नाही देऊ शकली मला साथ
म्हणुन मी तिला कधी नाव नाही ठेवलं
सांगण्याच तात्पर्य ऐवढच की
आपण मित्र निवडू शकतो
पण प्रेम आपल्याला निवडत
पण नाही राहत ते प्रेम आयुष्यभर आपल्यासोबत
कारण ते प्रेम आपल्या आपल्या मधे लपलेला तो असतो ना त्याची आणी आपली ओळख
करून देण्यासाठी आलेलं असतं..
आपण काय आहोत आपल्याला काय हवं असत हे आपल्याला ते समजण्यासाठी प्रेम आपल्याला निवडतं...
प्रेम ही सुंदर भावना आहे तिला कुणी दुखवा नका
नाही देता येत काही लोकांना साथ पण याचा अर्थ असा नाही की त्यांना प्रेम म्हणजे काय हे माहीत नसतं..
आपल्याला दुखावून ते लोक ही
नसतात सुखात फक्त ते बोलुन दाखवत नाहीत
एक सल त्यांच्या ह्रदयात आपल्याला सोडुन जाताना निर्माण झालेली असती आणी ती सल आयुष्यभर त्यांना सलत राहती...
मला ही नाही भेटलं माझं प्रेम
पण मी पुन्हा प्रेम करणार
आणी या वेळेस ते प्रेम मी मिळवणार तुम्ही ही करा प्रेमात धोखा खाला म्हणून
आयुष्य बरबाद करून घेऊ नका
आणी दुस-याचं ही करू नका
आयुष्य खुप सुंदर आहे
नव्याने पुन्हा सुरूवात करा
दुखाःना मनात ठेवुन त्यांना बोथट करा
आणी तुमच्यावर त्या दुखाःना हावी होऊ देऊ नका...

♡...राहुल घोरपडे...♡