नशीब कसले

Started by कदम, June 20, 2017, 09:31:56 PM

Previous topic - Next topic

कदम


बघ ना नशीबाने कसा खेळ मांडलाय
नशीब कसले कुकाळाने थैमान घातलाय

वाटली जरी आपलीशी जीवनगाथा
नतमस्तक होतो बेड्यान पुढे जीवनाच्या माथा

सामोरी अथांग सागर पसरला सुखांचा
मनाला माञ जडलाय आजार व्यथांचा..

अंकुर प्रेमाचे फुलते हृदयात राजरोस
नतमस्तक या नात्यांपुढे हा तर उपरा लांबीचा कोस