तू हास्यानेच बोल

Started by abhishek panchal, June 21, 2017, 11:09:58 AM

Previous topic - Next topic

abhishek panchal

तुझ्या माझ्या नात्याची ,
प्रीत ती अबोल
शब्द पुरत नाहीत ,
तू हास्यानेच बोल

हसू तुझं गोड ,
त्याला कशाची ना तोड
जग - दुनियादारी ,
तू फिकीर सारी सोड

जग आणि प्रेमाचा ,
इथे नेहमीच असतो झोल
शब्द पुरत नाहीत ,
तू हास्यानेच बोल

हाक मार कधीही ,
तू भेटी गाठी साठी
आलो म्हणताच क्षणी ,
मी असेन तुझ्या पाठी

दचकून मग उगी ,
असा सोडू नकोस तोल
शब्द पुरत नाहीत ,
तू हास्यानेच बोल

Whatsapp facebook मेसेज ,
आता काहीच नको सोडू
आई बाबा दादा ,
कुठेच सिक्रेट नको फोडू

Chatting शिवाय बोलून ,
विषय करू नकोस खोल
शब्द पुरत नाहीत ,
तू हास्यानेच बोल

©Abhishek Panchal,
(9028875958)