दोन फुले

Started by राहुल, January 31, 2010, 12:19:28 AM

Previous topic - Next topic

राहुल

दोन फुले
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
आलीच नाहीस तू त्या दिवशी
माझीच असूनही का तू वाटलीस परकी
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
जराही भुरळ पडली नाही तुला
सोबत आल्या गेल्या क्षणाची
राखरांगोळी केलीस तू आपल्या प्रेमाची
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
तरीही वाट पाहतो आहे मी
तरीही वाट पाहतो आहे मी....कारण,
जगण्याची आणि तुझ्यावर निरंतर प्रेम करण्याची प्रेरणा मला देतात,
दोन फुले तुला द्यायला आणलेली,
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलीली
दोन फुले तुला द्यायला आणलेली
सुगंध आणि दरवळ त्यांचा आजही मनात आहे
कारण फार प्रेमाने होती मी ती फुले आणलेली
आजही आहेत कोमेजलेली सुंगंध उडुनी गेलेली
दोन फुले तुला द्यायला आणलेली....
दोन फुले तुला द्यायला आणलेली....
तुला द्यायला आणलेली....
तुला द्यायला आणलेली....
तुला द्यायला आणलेली दोन फुले....
युगान्तीक.......

madhura

दोन फुले तुला द्यायला आणलेली
तरीही वाट पाहतो आहे मी
तरीही वाट पाहतो आहे मी....कारण,
जगण्याची आणि तुझ्यावर निरंतर प्रेम करण्याची प्रेरणा मला देतात,
दोन फुले तुला द्यायला आणलेली,
आजही आहेत कोमेजलेली, सुगंध उडुनी गेलीली
दोन फुले तुला द्यायला आणलेली


good one.


MK ADMIN

post title in marathi from next time. have edited it now

Parmita


vicky4905

zakkaaass ahe re keep it up....

santoshi.world

छान आहे कविता!!! ........ विरह जाणवतोय तुझा तुझ्या कवितेतून ........... पण मला असे वाटते की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली की तिची पुन्हा वाट पाहण्यात काहीच अर्थ नसतो .............. कारण जर ती व्यक्ती आपली असती तर ती कधी निघून गेलीच नसती ................

gaurig

chanach jamali aahe kavita........keep it up.....