माय गेलीया माझी पंढरी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 21, 2017, 10:45:04 PM

Previous topic - Next topic
माय गेलीया माझी पंढरी
अवघी विठाई तिच्या मनी
अनवाणी पायांन तिनं
घेतलं रं विठूरायच दर्शन ध्यानी

विठुराया रं खरंच तू भक्तांचा पाठीराखा
एकदा देणा तू मायला माझ्या दर्शन
संसार त्यागूनी माय नं केलं
बघ तुजसाठी पायाच घर्षन

ना ऊन ना तहान बघ
तिनं केलं र तुझ्यासाठी सर्व अर्पण
का परीक्षा पाहतोस रं माझ्या मायची
तिन केलं बघ दिंडीतून तुझं वर्णन

सोपवली बघ तिनं
संसाराची चावी तुझं हाती
नेशील तू नाव संसाराची त्या पैल तिरी
सुख वर्षावाच्या नदी काठी

आली बघ सर्व सोडुनी
विठुराया माय माझी तुजसाठी
प्रेमानं घास तू भरवशील
आमच्या परिवारासाठी


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर