कोठडी

Started by गणेश म. तायडे, June 22, 2017, 03:25:51 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

चूक कुणाची नेमकी माहित नाही, पण जेव्हा एका निरपराध व्यक्तीला काही कारणाने किंवा काही चुकीने पोलीस कोठडी मध्ये डांबून ठेवले जाते, तेव्हा त्या चार भिंतींना पाहून त्याच्या मनात ज्या उद्वेगाने भावना प्रकट होते ती इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

एकटा राहिलो मी इथे
ना माझा ना मी कुणाचा इथे
होते जे सारे जिवलग इथे
उरले ना आता ते जिवलग इथे
उजेडातील अंधार इथे
हरवलेली आज वाट इथे
झाकलेली डोळे दिसती इथे
स्वप्नांवर गडद पांघरून इथे
हसणेही असामान्य इथे
रडण्याचा नुसता छंद इथे
काळोखातील सावली इथे
मीच हरवलो आज इथे
चूक माझी काय इथे
कोंडलो मी, माझे मन इथे
दिसता किरण आशेची इथे
दाटून येई आकाश इथे
जीवन मरण अंतर ना इथे
हरलो मी ना उरलो इथे

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11