कविता ॥ सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा ॥

Started by siddheshwar vilas patankar, June 22, 2017, 05:48:28 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


आयुष्याच्या वर्तुळात

सुखाच्या त्रिज्येने आनंदाचा व्यास काढावा

कर्मरूपी पाया टाकून

हळूहळू मोक्ष साधावा ॥

व्यर्थ उगा दुःखाचे परीघ पाहून

का विवंचनेस क्षेत्रफळात मिसळावे ?

परमार्थी खरा अर्थ जाण मानवा

मरणास मध्यबिंदू मानुनी जगावे  ॥

हर एक कसोटीत खरे उतरावे

परिघांना उचलून दूर फेकून द्यावे

कर्मास सुखाच्या वर्गाने गुणावे

पुण्याचे क्षेत्रफ़ळ वाढवत न्यावे

वाढवत न्यावे , अंतिमतः भगवंती सुखे लीन व्हावे ॥



सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C