न कळलेलं प्रेम.

Started by Dnyaneshwar Musale, June 23, 2017, 08:35:25 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

आज नाही तर
उद्या मी तिच्याशी
बोलेल असं तिला वाटायचं
ओठावर आलेलं प्रेम
जिभेवर मी लोटायचो.

मी तिला भेटावं
म्हणुन ती सायकलची हवा सोडुन द्यायची
पंचर झाली म्हणुन माझी सायकल
सायकल वाल्याकडं राहायची,
गांधीन माश्या चावल्यागत तोंड
सुजवून ती एकटीच रडत बसायची.

माझ्या जवळ आली
की तिला चैत्र पालवी फुटायची,
बाभळी वाणी माझ्या शरीराची
पान गळ झाल्यासारखी माझी मलाच वाटायची.

लुक लुकनारे डोळे
तिचे चांदण्या सारखे मलाही वाटायचे
अगदी जवळुन पाहावं म्हटलं
तर मला माझेच डोळे सूर्या सारखे पेटलेले वाटायचे.

नक्षत्रा वाणी सुंदर तरी ती
माझ्या माग  का फिरायची
हे  काय कळत नसायचं,
माझ्याही पापण्या ओलवतात
हे एकटेपणात मलाही दिसायचं.

उंच बगळ्या सारख्या मानेने ती
अंगणातून न्याहाळत मला असायची,
शाळा संपली, अन मग ती मला
पिंजऱ्यातल्या पोपटा सारखी
रोज गुदमरलेली दिसायची.