पेल्यात नशील्या

Started by शिवाजी सांगळे, June 23, 2017, 08:49:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पेल्यात नशील्या

मौनात सागराच्या पाताळ व्यापलेले
नेत्रात कोणते या आभाळ  दाटलेले

डोळे  सरोवरी हे  घे सावरून त्यांना
जातील बावरूनी  घायाळ जाहलेले

पेल्यात या नशील्या सारेच धुंद होते
बेहोश  होत  गेले ते  लाळ  घोटलेले

सारी कथा कहानी ती वेगळीच होती
साक्षात भोगले मी ते काळ भारलेले

सोडून पाश माझे दे मोकळे करूनी
मौनात ठेव बाकी आभाळ गोठलेले

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Santosh Alanjkar

सर ,  खूपच प्रभावी .... अप्रतिम...   अभिनंदन !!!

शिवाजी सांगळे

मनस्वी आभार संतोषजी...
आपण माझ्या कविता लेख फेसबुक माझ्या पुढील ब्लाँगवर सुद्दा वाचु शकता.
http://shivsangle.blogspot.com
पुनश्चः धन्यवाद
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९