गर्लफ्रेंड बाॅयफ्रेंड

Started by कदम, June 24, 2017, 09:01:10 AM

Previous topic - Next topic

कदम


कधी कधी प्रेम करायला पाहिजे
चोरून गर्लफ्रेंडला बाॅयफ्रेंडने भेटायला पाहिजे

कधी कधी विरहात तिने रडायला पाहिजे
दाटलेल्या उराने मिठ्ठीत त्याचा हसायला पाहिजे

कधी कधी तिने रूसायला पाहिजे
दुःखावलेल्या भावनांना त्याने मनवायला पाहिजे

कधी कधी कधी नाही जे घडलं ते घडायला पाहिजे
स्वप्न एकमेकांच्या मनातील साक्षात उतरलं पाहिजे

कधी कधी दोघांचेही भंगले स्वप्न पाहिजे
घेवून माग नव्याने पुन्हा रंगले पाहिजे

कधी कधी गर्लफ्रेंड लाजली पाहिजे
अशी शिट्टी बाॅयफ्रेंडची वाजली पाहिजे