अशी लागली मनाला हुरहूर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 24, 2017, 10:06:39 PM

Previous topic - Next topic
अशी लागली मनाला हुरहूर
आली बघ पावसाची भुरभुर
पावसात या तुझा वेगळाच नूर
तुझ्या त्या मदमस्त नजरेत झालो मी चूर

का टाकलास तू मज वर प्रेमाचा भार
तुला आलाय कसल्या घमंडीचा जोर
जसा सौंदर्याच्या घमंडीत नाचणारा मोर
घमंडित तुझ्या स्वप्न झाले माझे दूर

आता समजून घेण्याची वेळ झाली फार
अश्रूंचा माझ्या वाहू लागला पूर
जेव्हा लक्षात आलं माझ्या तेव्हा
निघाला होता हृदय जळाल्याचा धूर


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर

Sandhya Shamala Shinde

manala hurhur....ya shabdacha arth fkt vachnarya mansana samajat....