गझल

Started by yallappa.kokane, June 25, 2017, 07:05:59 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

वृत्त  - आनंदकंद

गा गा ल गा ल गा गा .... गा गा ल गा ल गा गा
२ २ १ २ १ २ २... २ २ १ २ १ २ २ = २४ मात्रा

गझल

माणूस जीव माझा जाळीत फार होता
त्यांच्या पुढे चितेचा अंगार गार होता

भारीच त्रास झाला खोट्या जगात येता
गर्भात माउलीच्या आराम फार होता

ही वाट पावसाची पाहून फार झाली
म्हणतात तो ढगाला भलताच भार होता

मी टाळलेच होते भेटायला सखीला
चंद्रा तुझा पहारा रात्रीस फार होता

ते शब्द भावनेचे सांगून खूप गेले
तो अर्थ सांगणारा माझाच शेर होता


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२५ जून २०१७
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर