मी नाही आता तुला आठवणार

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 26, 2017, 07:02:17 AM

Previous topic - Next topic
मी नाही आता तुला आठवणार
जाता जाता तुला फक्त एकच सांगणार
सातजन्माची सोबत आता तुटणार
प्रीत तुझी माझी पुन्हा नाही जुळणार
जुळलेलं नात आता कस तोडणार
पण शेवटी तुला एक सांगू
तुझ्या विरहात एक दिवस मी मरणार
लिहावं वाटतं मला खूप
तुझ्या विषयी पण तू कुठं प्रेम जपणार
ज्या दिवशी मी सरणावर जाणार
त्या दिवशी खर सांगू तू खूप रडणार
नाही जरी आठवलो मी तुला
एक ना एक दिवस तो दिवस येणार
जिथं तू असणार पण मी नसणार
तो दिवस माझ्या अंत्ययात्रेचा असणार


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर