क्षण

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 27, 2017, 05:53:55 AM

Previous topic - Next topic
तो एक क्षण मला
नेहमीच छळत असतो
प्रत्येक वेळी स्वतःला
सावरण्याचा प्रयत्न  असतो

स्वतः ला वाचवण्याचा
त्या क्षणा पासून प्रयत्न करतो
पण नेहमीच त्या
क्षणात नकळत गुरफटतो

ते क्षण होतेच असे
जिथं तू फक्त माझी असायची
तू माझ्या मिठीत अन
भीती कोणाची नसायची

  ते श्वास तुझे पण हृदयाचे
ठोके फक्त माझे असायचे
सुगंधित ती हवा वहायची
अन कोमल ते स्पर्श असायचे

रम्य ती संध्याकाळ व्हायची जेव्हा
त्या क्षणाची थोडी सुद्धा जाणीव नव्हती
पण एक अनोळखी भीती मनी होती
त्या क्षणी तिची सोबत सुटत होती

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर