Ek Positive Virah Kavita

Started by aachank, June 27, 2017, 05:45:38 PM

Previous topic - Next topic

aachank

सांझे च्या गर्भी
पहाट दडलेली
पहातो मी परी
एकटाच..

तिच्या परतीची
दिशा ती मंगल
खुणावतो ध्रुव
आकाशात..

तिचे ते हे मीपण
सहज गळेल
आश्वासतो चंद्र
उगवताच..

नात्यातली ओढ
कर्तव्याची जाणीव
तीस होऊ देईल
निश्चितच..

-आशुतोष करंदीकर