कविता

Started by Rahul Ghorpade, June 27, 2017, 09:45:13 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

बसलो होतो एकांतात
आठवणींना तुझ्या कुरूवाळत
अलगद पाणावले गं डोळे
दुखांच्या खपल्या माझ्या निघल्यावर

नेहमी असचं होत गं
स्मृतींना तुझ्या स्मरल्यावर
आठवांच्या त्या क्षणांना
अलगद मी झेडल्यावर

हरवून गेलो गं मीच मला
प्रेमात तुझ्या पडल्यावर
होईल पुन्हा भेट तुझी अन माझी
चालताना आयुष्याच्या या वाटेवर

अश्रुंची धार ओघळते डोळ्यांतुन
कविता लिहीताना कागदावर
वाचणार नाहीस कधीचं तु कविता माझी
म्हणून नाही लिहीत मी ती पुर्ण पानावर

♡...राहुल घोरपडे...♡