हे जीवन आता थकल्या गत वाटू लागलं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 27, 2017, 10:13:40 PM

Previous topic - Next topic
हे जीवन आता थकल्या
गत वाटू लागलं
काही अनपेक्षित गोष्टी जवळ
आल्या अन जीवन अधुरंवाटू लागलं

का कोणास ठाऊक
श्वास रोखल्या गत भासू लागलं
प्रेम नावाचं अमृत प्यायलं खर
पण ते पण विषा गत वाटू लागलं

प्रेमाचं फुल सरळ धरलं खर
पण ते ही उलटं असल्या गत वाटलं
नशीब पण आता माझी
थट्टा केल्या गत वागू लागलं

खडतर वाट प्रेमाची सोपी
करण्यासाठी जीवाचा जिवलग बनवला
पण तोही त्याच्या जीवा साठी
आता दुष्मना गत वागू लागला


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).
मो.9637040900.अहमदनगर