दर्शनाविन

Started by कदम, June 28, 2017, 12:27:07 AM

Previous topic - Next topic

कदम

देह मानवी देवा दिलास जरी
आत्म्याविना मुर्ती अधुरी
असी काय देवा तुझी ईच्छातरी
दर्शनाविन तुझ्या निर्मीती अधुरी

सृष्टी अशी ही निर्मिली
दृष्टीहीन सृष्टी असुनही दृष्टी
दूरदृष्टी मानवी मतीस लेपली
आविष्काराविन ओशाळली सृष्टी

कुठे होतो अंधाराचा कोप
कुठे वाढतो तेजाचा रोष
तेज पावता ईथे लोप
वाटतो जणु भास्कराचा कोप

वाहणारा वारा भराभर
सळसळणारे रक्त अंगभर
तुझीच करणी देवा जगभर
असा का? अदृश्य तु आजवर