स्वप्नांनाे

Started by शिवाजी सांगळे, June 29, 2017, 11:24:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

स्वप्नांनाे

मेघांवर स्वार होतो मी
पाऊस मिठीत घेतो मी

ऐकून दुख:, सुखाचे ते               
सोडून खुशाल देतो मी

थांबून रहाच स्वप्नांनाे
घेण्यास कवेत येतो मी

माझाच हट्ट कशा साठी
सोडून अहंम जातो मी

झालेत शब्द लिहूनी जे
बांधून सुरात गातो मी

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९