सहकार

Started by कदम, June 30, 2017, 12:06:51 AM

Previous topic - Next topic

कदम


या जगीच्या रीतिरिवाजात एकला माणुस
उठवून आवाज आवाजात सहकार झालं

भिंती या नीतिमत्तेच्या अभेद्य सर्वदुर
देवून मती वाढवण्या गती सहकार झालं

हार कधी आली तेंव्हा केला उपदेशांनी आधार
जिंकून करण्या ध्येयाकडे विहार सहकार झालं

वाळवंटी माझ्या भावनांना फोडूनी कंठ
करण्या बगीचा स्वप्नांचा जीवनी सहकार झालं

तत्वांनी माझ्या दिशाहीन जेंव्हा मला केलं

पाजून बोधी तत्वज्ञान मार्गक्रमणा सहकार झालं