प्रेम

Started by Rahul Ghorpade, July 01, 2017, 11:48:00 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

पाऊसात जाऊन आज
पाऊस व्हावसं वाटतं
वा-यांसोबत जाऊन आज
द-या खो-यांत जावस वाटतं

येशील का तु सोबत सखे माझ्या
पाखरू होऊन आपण उंच भरारी नभात घेऊ
क्षितीज्या वरच्या वाटांवर आपण
आपल्या पाऊल खुणा आज उमठून येऊ

मी तुझा अन तु माझी
सखा सखी होऊन जाऊ
प्रेमाला आपल्या आज आपण
रेमीश गाठीत बांधून घेऊ

सप्त सुरांच्या तालेवरती
सखे आपण शब्द गीत लिहू
आता नको दुरावा आपल्यात
प्रेमाचे आपण प्रेम गीत गाऊ

♡...राहुल घोरपडे...♡