पथ ...... पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |

Started by विक्रांत, July 02, 2017, 12:12:26 AM

Previous topic - Next topic

विक्रांत


पथ

पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |
कां नाहीं जेवीं तरुवरा | येणें जाणें ॥ ४९० ॥

चालतो पथिक परी नच पथ
वाट पावुलात वचेचिना ||

दिसतात वृक्ष चालले मागुती
परी त्या गती नाही जैसी ||

तैसा देवा ठेव मजला तटस्थ
येवोत जावोत सुख दु:खे ||

स्थैर्याची सखोल मुळे खोलवर
जावून जिव्हार स्तब्ध व्हावे ||

ज्ञानदेवी माय आन न मागणे 
शब्दांचे जगणे तुझ्या व्हावे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in