बेपर्वा

Started by Asu@16, July 03, 2017, 02:11:02 AM

Previous topic - Next topic

Asu@16

      बेपर्वा

कधी हसावे, कधी रूसावे
जगणे व्हावे आनंदी 
राग लोभ करून बंदी
मन करावे स्वच्छंदी

        येता जाता उगा हांसती
        रस्त्याने जातांना कुणी
        औदार्याचा मान करावा
        हाय हॅलो म्हणून क्षणी

ब्रँडी, व्हिस्की नकोच मुळी
वाईनची चव घ्यावी तरी
चहा, कॉफी, लस्सी सरबत
घ्यायचेच आहे आपल्या घरी

         आयुष्य सोसले जगण्या
         'काय म्हणतील दुसरे' म्हणून
         आता तरी जगू बेपर्वा
         जगाला लाथ हाणून

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita