गुर्जी

Started by Asu@16, July 03, 2017, 02:13:36 AM

Previous topic - Next topic

Asu@16

        गुर्जी

एक होता शिक्षक
त्याला गुर्जी म्हणायचे
दिसण्या वागण्यात नेहमी
गुर्जीच वाटायचे
नाही कुणी सांगितले
तरी समजायचे
गुर्जींची स्वारी आली
जरा नीट वागायचे
कुणालाही कधीही
कुठेही भेटायचे
समोर बघून गुर्जींना
पोरं घाबरून लपायचे
मोठी माणसं आदराने
'रामराम' म्हणायचे
गुर्जींच्या सल्ल्याशिवाय
पानही नाही हलायचे
खाणं पिणं देणं घेणं
सारे गुर्जींचे ऐकायचे
गुर्जीं साठी गाव सारे
शाळाच असायचे
चोवीसतास घंटेविना
शाळेतच वाटायचे
तुटपुंज्या पगारावरही
गुर्जी खुष असायचे
सुख दुःख सारे पिऊन
गुर्जी गावाला शिकवायचे
छडीच्या हत्याराने
गुर्जी मुले घडवायचे
गाव सोडून गेले म्हणून
सारे गाव रडायचे
गुरुजी जाऊन सरजी आले
फरक काय पडायचा
शिक्षक झाले मजूर
तरीही देश घडवायचा !

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita