अभय दे मला

Started by कदम, July 03, 2017, 10:39:14 PM

Previous topic - Next topic

कदम

या मृत्यूच्या भयातून अभय दे मला
जगण्या उदंड जीवन आश्रय दे मला

रणकंदनी घडविण्या जीवन बळ दे मला
करेल भय पलायन मृत्यूचे असे स्थळ दे मला

रोखून श्वास घेतोय श्वास मी भुतळी
सळसळू दे रक्त धमण्यातील असा प्राणवायू दे मला

होईन ज्येता संघर्षाच्या वाटेवर सर्वस्वी
देहास बलदंड काया ज्ञान तेजस्वी दे मला

भय संपत नाही मृत्यूचे ईथे मनी यम जागृत
कर अमर मज पामरा प्राशना अमृत दे मला