देवा देवा

Started by शिवाजी सांगळे, July 04, 2017, 01:06:44 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

देवा देवा

नसे चित्त हे आता थार्‍यावरी देवा
फिरे देह माझा हा वार्‍यावरी देवा

तुझे भक्त रे आम्ही पायीच चालावे
दिमाखात ऊभा तू वीटेवरी देवा

कुणा तूप रोटी दूजाभाव तू केला
असे पोट कोणाचे हातावरी देवा

निती गैर झाली लोकांची पहा आता
तया चांगले घ्यावे फैलावरी देवा

दिला वापराया एका मोकळा वाडा
जगावे कसे मी या वाटेवरी देवा

पडू देत यंदा धोधो पाऊस येथे
पहा राबतो खासा शेतावरी देवा

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९