* बाकडा*

Started by amolbarve, July 06, 2017, 02:09:38 PM

Previous topic - Next topic

amolbarve

           * बाकडा*
सरळ अश्या ह्या वाटेवरती,हिरवळ माज्या अवतीभवती
सांजा तिन्ही मजशी लपंडाव खेळती
चार फळ्याचा -चार पायाचा,गरीब असा मी
तरी ताठ कण्याचा
पानगळीचा ,मोहक कळीचा,इवल्याश्या त्या अंकुराचा खंबीर असा रे पाठीराखा
आंनदाच्या गोड क्षणाचा,विरहाच्या अतुट वेदनेचा,विसव्यातील शांत मनाचा
उन्हाळ्यातही विना टोपीचा,पावसाळ्यातही विना छत्रीचा
हिवाळ्यातही विना रजईचा
सर्वांचा सोबती तरीही एकटा,सरल अश्या ह्या वाटेवरती विसावलेला मी वाकडा 'बाकडा'
                               -अमोल सुभाष बर्वे