माझी सखी

Started by आरती बेलोटे, July 07, 2017, 07:48:36 PM

Previous topic - Next topic

आरती बेलोटे

माझीही आहे एक सखी
तिच्याबद्दल बोलू काय अन किती
हसू तिचे असे
जणू बरसणारी सर श्रावणातील
बोल तिचे असे
जणू कोकिळॆच्या कंठातील
चाल तिची अशी
जणू मासोळी पाण्यातील
वावर चहुकडे असा
जणू फुलपाखरू फुलावरील
रूप तिचे असे
जणू चांदणे नभातील
चित्त तिचे असे
जणू पाणी खोल सागरातील
प्रिय ती माझ्यासाठी अशी
बासरी श्रीकृष्णासाठी जशी
खरचं अशीच आहे माझी सखी......
                         (-आरती बेलोटे)

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]