पुष्पगुच्छ

Started by कदम, July 08, 2017, 10:40:23 AM

Previous topic - Next topic

कदम


तो गुच्छ फुलांचा निर्गंधीत
माझ्या हातातील होत असे सुगंधित..

पुंजक्यात त्या एकवटलेल्या फुलांना
जेंव्हा आस असायची तुझ्या हातांशी भेटण्याची...

रोज फुले गुंफून पुष्पगुच्छ मी करायचो
तुला देण्यासाठी काटे तुडवायचो...

आज तो ऋतु नाही उमलण्याचा फुलांचा
तुझ्यासाठी प्रेमाचा सुगंध देणा-या मनाचा..

तो पुष्पवृक्ष अजूनही तसाच आहे
त्यांचा गुंफण्या पुष्पगुच्छ मी आज गंधहीन आहे