भुलावे

Started by शिवाजी सांगळे, July 09, 2017, 05:05:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भुलावे

सारेच का ते भुलावे खरे होते
ईशारे नजरेतील का खरे होते

फुलाशी थांबणे दवाचे निवांत
दाखविण्या प्रेम एवढे पुरे होते

घरगंळला न थांबला कळी संगे
एवढेच आयुष्य दवाचे खरे होते

वर्णावे किती ते गोडवे पात्यांचे
चुंबाया धरणीस बहाणे बरे होते

दशा सर्वात ती झाडाची वेगळी
पानांतुन अश्रु ढाळीत सारे होते

वाजविणे शिळ चौफेर मोकळी
एकटेच तरबेज येथले वारे होते

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९