मन धजत नाही...

Started by कदम, July 09, 2017, 08:22:28 PM

Previous topic - Next topic

कदम


विसरू शकत नाही

तुझ्या प्रेमाला
आठवणींने तुझ्या

कैद केलाय मला...

पहिलं वहिलं आणि शेवटच्

तु माझं प्रेम
विस्मरणून नव्याने करायला प्रेम
मन धजत नाही

चेहरया मध्ये प्रत्येक

भासतो चेहरा तुझा
पांघरून नवा चेहरा

नव्याने करायला प्रेम
मन धजत नाही

तुच होती माझ्या

हृदयाचे ताल सुर
चुकनही लाभत नाही

आता त्याला धीर

मन हेलावते

तुझ्या प्रेमळ आठवणीत
झुगारून प्रेम तुझे,

नव्याने करायला प्रेम ,
पेलावत नाही