दीप उजळीत जा

Started by Asu@16, July 09, 2017, 09:18:16 PM

Previous topic - Next topic

Asu@16

   दीप उजळीत जा 

आकाशातून चालतांना
चांदणे शिंपित जा
वाटेवरच्या काट्यांमधूनही
फुले वेचित जा.

अंधारल्या जीवनी
दीप उजळीत जा
घेतले ते सगळे
जगी उधळीत जा.

जायचे कुठे आणि कसे
पुण्य साठवित जा
वाटले कधी असहाय
तया आठवित जा.

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita