शोध आयुष्याचा घेता ...........?

Started by Ashok_rokade24, July 10, 2017, 04:33:55 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

शोध आयुष्याचा घेता घेता ,
आयुष्यच संपायला आले ,
हाती काहीच लागले नाही ,
अनुभवाचे गाठोडे  फुगले ॥

मुखी बोल अमृताचे ,
हाती जहरी प्याले ,
तडफड जिवाची त्यांच्या ,
विष हसूनी मी प्राषीले ॥

आधाराशी हात दिला ,
मार्गात पेरीले काटे,
काट्यातूनी मार्ग शोधीला ,
नीत वेचीत आलो फुले ॥

वार वर्मी किती झाले ,
हसूनी सारे झेलीत आलो ,
जाणीव वेदनांची झाली ,
स्वकीयांनी असे घाव दिले ॥

आयुष्य संघर्षांने भरले ,
सदैव मी जिंकत आलो ,
ज्यांच्या साठी रणी ऊतरलो ,
त्यांनीच पराजीत मज केले ॥

                           अशोक मु. रोकडे .
                            मुंबई .