प्रितीला माझ्या

Started by कदम, July 12, 2017, 10:51:22 AM

Previous topic - Next topic

कदम


प्रितीला माझ्या ती प्रित सांगून गेली
प्रितीला माझ्या ती जगीची रित सांगून गेली

प्रितीवर प्रित मी स्वतःला झोकून केली
प्रितीला माझ्या ती दुःखात भिजवून गेली

प्रीतीला होवून प्रिय प्राणप्रिय जाहली
प्रितीमुळे स्वप्न फुले कितीतरी कोमेजली

प्रितीस माझ्या ती प्रचिती देवून गेली
प्रितीस माझ्या ती तिराने विरहाच्या भेदून गेली

प्रिती मीही वार काळजावर झेलून केली
प्रिती तिनेही वार काळजावरचे मोजून केली