तडका - दहशतवाद्यांनो

Started by vishal maske, July 12, 2017, 10:04:59 PM

Previous topic - Next topic

vishal maske

दहशतवाद्यांनो

हिंमत नाहीच तुमच्यात
भेकड तुमचा बाणा आहे
लपुन छपुन करता वार
हा निष्कर्षही जुना आहे

दहशतवादी लेबल तुमचं
झटक्यासरशी गमवा हो
माणूसकी जपण्या इतकी
थोडी अक्कल कमवा हो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३