तत्वं

Started by Suraj Nehete, July 12, 2017, 10:10:03 PM

Previous topic - Next topic

Suraj Nehete

तत्वं

जवळचं कुणीतरी रुसून बसलंय म्हणून;
अंकुर फुटायला आलेलं शब्दांचं बीज आतच कुजतं आहे...
घरी कोणीच नाही आपली वाट बघायला म्हणून;
कुणीतरी अॉफिसच्या चार भिंतीत निवांतपणा शोधतं आहे...

पाऊस नाहीच पडत आता आधीसारखा म्हणून;
कुणीतरी कडू-गोड आठवणींच्या पावसात चिंब भिजतं आहे...
मोठं झाल्यापासून कुठं लागते आता शांत झोप;
पण माझ्यातलं बाळ मात्र माझ्याच कुशीत गाढ निजतं आहे...

दिलास एवढा जिव्हाळा की मी गुंतलोय त्यात;
म्हणून, न बोलणं तुझं काळजात कुठंतरी आत खुपतं आहे...
झुगारली कुणी पवित्रता नात्याची आपल्या जरी;
तळहातावर सारी तत्वं ठेवून कुणीतरी नातं जपतं आहे...

सुरज