तुझी माझी आठवण

Started by ganesh bunde, July 12, 2017, 11:53:28 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde


  तुझी माझी आठवण

प्रत्येक क्षण माझ्या जीवनाचा तुझ्याच साठी असायला हवा होता
तुझाच चेहरा नजरेसमोर सदैव दिसायला हवा होता
तू तर सोडून गेली मला,
माझ्या मनीच्या भाव तुझ्या मनात बसायला हवा होता
तू आता मला एकटा सोडून गेली
प्रेमाचा रंगमहाल मोडून गेली
तुझी गरज होती जेव्हा ,
तेव्हाच तू मन माझे तोडून गेली
माझ्या मनीचा घाव तू पण जरा सोसायला हवा होता..
तू तर आठवण हि माझी कधी काढत नसेल
तू तर जीवनात तुझ्या खुशीत असेल
वाटतंय कधीतरी माझ्या जवळ बसशील तू
हळूच मला आठवूंन हसशील तू
तू पण माझ्यासोबत  आता हसायला होता