माझं मन माझं राहत नाही

Started by कदम, July 13, 2017, 10:06:48 PM

Previous topic - Next topic

कदम


माझं मन माझं राहत नाही
त्यात असते तुझ्या विचारांची ग्वाही
माझं मन माझंच ऐकत नाही
चालते मनावर तुझीच हुकूमशाही...

मग मन माझं मवाळकीनं वागतं
तुझ्याच प्रेमासाठी तडफडून उठतं
माझं मन माझं राहत नाही
डोकाऊन तुझ्या अंतरंगात पाहतं...

हे तर तुझंच आहे प्रेम
ज्याचं साम्राज्य माझ्या मनावर
हे तर तुझंच आहे प्रेम
ज्याचा करविता  मनाला होत नाही आवर....