व्हँन गाँग

Started by Kumar Sanjay, July 14, 2017, 12:20:55 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 रात्र एकाच विचारात
उलटत होती ....
अायुष्याचा समग्र प्रवास
डोळ्यांपुढे तंरगत उभा
होता

भिंतीवर लटकलेली चित्रे
यांतूनच जन्माला
आली होती कदाचित
अन् ओळख ती पण
फाऊ- राऊ - वेडा चित्रकार

अख्खी रात्र
कोरा कॅनव्हास
हातामधील कोरडा ब्रश
शोधतो नवीन रंग, आंरभ

हळूहळू टेकाड्यामागून
निघणारा सूर्य
चर्चमधील सकाळच्या
प्रार्थनांचे स्वर
अन् त्यांसबोत रंगलेला कॅनव्हास
लाल रक्ताने
गाँग सूर्योदय झाला आहे

# कुमार संजय
7709826773