==* खोटा पलाश आहे *== (गजल)

Started by SHASHIKANT SHANDILE, July 14, 2017, 04:08:04 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

 (गजल) लगावली : गागालगा/लगागा x२

माझाच तो इशारा माझाच नाश आहे
माझाच हात देवा आता हताश आहे

देहात भेटला हा स्वार्थीच प्राण देवा
स्वार्थात भांडता मी पाडीत लाश आहे

देशील का मला तो निस्वार्थ प्राण आता
जातीत माणसाच्या काळा प्रकाश आहे

जाणार का उराशी ही जात माणसाच्या
ही जात जात नाही जातीस पाश आहे

प्रेमात जात आहे जातीत प्रेम नाही
रानात आज बाकी खोटा पलाश आहे
---------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!