माझी प्रीतीची आठवण

Started by ganesh bunde, July 14, 2017, 10:48:42 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde


माझी प्रीतीची आठवण
 
प्रत्येक रात्री तुला आठवून झोपतो
उठतो सकाळी तुलाच आठवून
जगतो कसा मी तुझ्या वाचून
तुझ्या प्रेमळ आठवणी मनात साठवून
तुलाहि कधी माझी आठवण येते का ?
देवाच्या नावा अगोदर मी तुझे नाव घेतो
देवापरी सखे मी तुला मन देतो
देवाचाआता मला विसर होतो
जेव्हा मनात माझ्या तुला आठवतो
तुही अशीच मला आठवून घेते का?
                             कवी - गणेश बुंदे 9595941269