माय

Started by Dnyaneshwar Musale, July 15, 2017, 03:15:32 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

भेग उकरून रघत
येत पाया,
फाटक्या वाटेला
धांदुकाची माया

झिजणाऱ्या हातावर
दारिद्र्याचे फोड
चतकुर भाकरीशी
मायेचं ओठ किती गोड.

वाशाला वासा लावुन
तुळई घेली झिजुन
दामटीची भाकर गेली
इसतात  भिजुन.

पदरात गोंजारून
गरिबीच इरलेलं पातळ
उन्हात चांदण डोकाव
अस माय तुझं प्रेम किती नितळ.

मपल्या साळ साठी
तेवत ठेवली इवलीशी बत्ती
तिच्या सावलीत हसायचा
कापडाचा हत्ती,

काटा मले टोचला त
पाणी माये तुझ्या डोळा
माऊली  किती सोसते तु ग
लेकरा साठी  कळा.