सवाल

Started by sanjweli, July 16, 2017, 08:19:41 PM

Previous topic - Next topic

sanjweli

१/०२/२०१७

सवाल
वटलो जरी मी,
तरी उभा आहेे
डेरेदार डौल माझा
आता मोकळा आहे

किलबिल पक्षांची नाही
बहर वसंताचा कोठे आहे
किडा मुंगीचा वावर आता
माझ्या अंगाखांद्यावर आहे

संपलो कोठे मी
पुन्हा बहरणार आहे
सुख दुःख भाग आयुष्याचा
भोग येेथे कुणा चुकला आहे

आस चातक मिलनाची
अजुन मला आहे
सवाल माझा आभाळाला
कसे क्षितिज तुला भेटले आहे.
© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३